केंद्र सरकारकडून दुकाने उघडण्याच्याबाबतीत ज्या मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत, त्याबाबत राज्य सरकारकडून अद्याप निर्णय होणे बाकी आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी रात्री जारी केलेल्या आदेशांबाबत राज्य सरकारकडून विधायक विचार केला जात आहे, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. केंद्र सरकारने जारी केलेले हे आदेश अद्याप राज्य सरकारकडून स्वीकारण्यात आलेले नाहीत, असे या अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.
17 एप्रिल रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र सरकारने औद्योगिक उपक्रम पुन्हा सुरू करण्यास विशेषत: नॉन-कंटेन्मेंट झोनमधील उत्पादनास परवानगी दिली आहे. मात्र, 21 एप्रिल रोजीच्या आदेशांद्वारे ही परवानगी मुंबई आणि पुण्यासाठी नाकारण्यात आली आहे.