कराड -गत चार दिवसांपासून कराड तालुक्यात करोना बाधितांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. तालुक्यात दररोज बाधित वाढत आहेत. ही संख्या 70 ते 80 च्या आसपास आहे. कराड शहरातीलही बाधितांचे प्रमाण दररोज 35 ते 40 ने वाढत आहे. गेल्या चार दिवसांच्या संख्येने कराड शहराने मलकापुरलाही मागे टाकले आहे. तर तालुक्यातील एकूण सात गावे करोनाचा हॉटस्पॉट ठरली आहेत. समूह संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना होणे गरजेचे आहे.
सध्या करोनाचा समूह संसर्ग सुरू आहे. या काळात बाधितांची संख्या वाढण्याची भिती प्रशासनाकडून यापूर्वीच व्यक्त करण्यात आली होती. मार्च ते जून या काळात ज्या गावांमध्ये करोनाची साखळी निर्माण झाली होती. ती साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आले. मात्र, सध्याची करोनाची साखळी तोडण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागत आहेत. तालुक्याची आरोग्ययंत्रणा रात्रंदिवस काम करताना दिसत आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून करोनापासून लांब असणाऱ्या कराड शहरातही दररोज बाधित वाढत आहेत. शहरातील बाधितांच आकडा 260 वर पोहोचला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनावर मोठा ताण आला आहे. पालिकेत नव्याने रूजू झालेले मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी अनेक प्रभावीशाली उपक्रम राबविण्यावर भर दिला आहे. पालिका कर्मचाऱ्यां बरोबरच स्वत: हजर राहून लक्ष देत आहेत. बाधितांची लवकरात लवकर माहिती मिळावी यासाठी शहरात त्यांनी टिळक हायस्कूल व शिवाजी हायस्कूल अशा दोन ठिकाणी अँटीजेन टेस्टची सोय केली आहे. तसेच दोन ठिकाणी फिव्हर क्लिनिक सुरू केले आहेत. याशिवाय शहरात निरंतर सर्व्हेक्षण मोहीम राबवली जाणार आहे. त्यामुळे बाधितांची संख्या कमी होणे सहज शक्य आहे.
कराड शहरात बेड व व्हेंटीलेटर न मिळाल्याने अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. यापुढील काळात अशी अवस्था निर्माण होऊ नये यासाठी पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात बेड व व्हेंटीलेटरची सुविधा करण्यात येणार आहे.
दरम्यान, शनिवार अखेर कराड तालुक्यात सापडलेल्या एकूण करोना बाधितांची संख्या 1153 इतकी झाली आहे. यामध्ये सुरूवातीच्या काळात करोनाचा मलकापूर मधील बाधितांची संख्या अधिक होती. मात्र, सध्या कराड शहराने मलकापूरलाही मागे टाकले आहे. शहरातील एकूण बाधितांची संख्या 260 इतकी झाली आहे. तर तालुक्यातील सात गावे करोनाचा हॉटस्पॉट ठरली आहे. यामध्ये कराड, मलकापूर, चोरे, उंब्रज, कालवडे, तारूख, म्हासोली, सैदापूर या गावांचा समावेश आहे.
शनिवार अखेर शहरात सापडलेली बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे शनिवार पेठ येथील 39 वर्षीय महिला, 57 वर्षीय महिला, 16 वर्षाचा युवक, 45 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय महिला, 58 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय पुरुष, 20 वर्षीय महिला, 43 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ येथील 65 वर्षीय पुरुष, 69, 40 वर्षीय महिला, 43 वर्षीय महिला, सोमवार पेठ येथील 30 वर्षीय महिला, 35, 30 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय पुरुष, येथील 8 वर्षाचा बालक, 21 वर्षीय महिला, 63 वर्षीय पुरुष,32 वर्षीय महिला, 65 वर्षीय पुरुष, 54 वर्षीय महिला, 58 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला, 58 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 55 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय महिला,42 वर्षीय पुरुष, रेव्हीन्यू कॉलनी येथील 60 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
कराड तालुक्यातील उंब्रज येथील 27 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय पुरुष, इंदोली येथील 45 वर्षीय पुरुष, 25 व 28 वर्षीय पुरुष, वाजोशी येथील 32 वर्षीय पुरुष, रेठरे बुद्रुक येथील 23 वर्षीय पुरुष, गोवारे येथील 68 वर्षीय महिला, गुथले येथील 26 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 69 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 38 वर्षीय पुरुष, चोरे येथील 57 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय पुरुष, वहागाव येथील 32 वर्षीय पुरुष, गोंदी येथील 25 वर्षीय पुरुष, विद्यानगर कराड येथील 26 वर्षीय पुरुष, खोडजायवाडी येथील 48 वर्षीय पुरुष, हणबरवाडी येथील 24 वर्षीय महिला, टेंभू येथील 70 वर्षीय महिला, शेणोली येथील 40 वर्षीय पुरुष, वाठार येथील 30 वर्षीय पुरुष, वडगाव हवेली येथील 55 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय पुरुष, कवठे येथील 62 वर्षीय पुरुष, कोरीवळे येथील 23 वर्षीय पुरुष, कोळे येथील 31 वर्षीय पुरुष, काले येथील 48 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय महिला, तळबीड येथील 34 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 55 वर्षीय महिला, तारुख येथील 44 वर्षीय पुरुष, विंग येथील 52 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 9 वर्षाची मुलगी, 4 वर्षाची मुलगी, 56 वर्षाची महिला, 40, 32 वर्षीय महिला, आगाशिवनगर येथील 65 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय महिला, 57 वर्षीय महिला, 84 वर्षीय पुरुष, वाघेश्वरवाडी येथील 54 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
ही संख्या कमी करण्यासाठी प्रशासनाबरोबरच नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
शिवाजी विद्यालयात ऍन्टीजेन टेस्ट सूरू
कराड नगर पालिकेच्या वतीने श्री शिवाजी विद्यालयात ऍन्टीजेन टेस्टसाठी खास केबिन बनवण्यात आले आहे. डॉ. दीप्ती आवळेकर, लॅब टेक्निशियन अनिता पवार, अरुण काळे, प्रसाद कांबळे, रोहन महापूरे, भारत पंचारिया हे या टेस्ट केंद्रात कार्यरत आहे. या केंद्राला तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी भेट देऊन प्रत्यक्ष टेस्टची पाहणी करुन माहिती घेत सबंधितांना सूचना केल्या. यावेळी आरोग्य अधिकारी आर. डी. भालदार, तलाठी संजय जंगम उपस्थित होते.