कराड -येथील कृष्णा हॉस्पिटलमधून शनिवारी 37 जण करोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कृष्णा हॉस्पिटलमधून आत्तापर्यंत एकूण 634 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शनिवारी डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये जाधववाडी-पाटण येथील 61 वर्षीय महिला, रेठरे बुद्रुक येथील 40 वर्षीय पुरूष, बुधवार पेठ – कराड येथील 20 वर्षीय युवक, शनिवार पेठ कराड येथील 14 वर्षीय मुलगा, 41 वर्षीय पुरूष, 17 वर्षीय मुलगा, आगाशिवनगर येथील 40 वर्षीय महिला, 19 वर्षीय मुलगा, 17 वर्षीय मुलगी, मलकापूर येथील 50 वर्षीय महिला, 28 वर्षीय पुरूष, 58 वर्षीय पुरूष, 26 वर्षीय महिला, 52 वर्षीय पुरूष, 35 वर्षीय महिला, 37 वर्षीय महिला, कोयना वसाहत येथील 37 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगी, 9 वर्षीय मुलगी, 17 वर्षीय मुलगा, 53 वर्षीय पुरूष, 37 वर्षीय महिला, 50 वर्षीय महिला, 18 वर्षीय मुलगा, कार्वे येथील 27 वर्षीय महिला, 7 वर्षीय मुलगा, 5 वर्षीय मुलगी, 64 वर्षीय महिला, 5 वर्षीय मुलगा, 2 वर्षीय मुलगा, शेणाली स्टेशन येथील 20 वर्षीय युवक, नेराळे-पाटण येथील 58 वर्षीय पुरूष, चिपळूण येथील 55 वर्षीय महिला, गोळेश्वर रोड – कराड येथील 29 वर्षीय पुरूष, सोळशी-नायगाव येथील 62 वर्षीय पुरूष, शुक्रवार पेठ कराड येथील 40 वर्षीय पुरूष, गोवारे येथील 6 वर्षीय मुलगा यांचा समावेश आहे.