पंढरपूर – सध्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या विचारांचा नसल्याची खोचक टीका भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली. आपण २० वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले. साहेबांच्या राष्ट्रवादीत काम केले. मात्र ही साहेबांची राष्ट्रवादी नाही, याचा मला विश्वास आहे, असं चित्र वाघ यांनी म्हटलं.
अकलूज नगर परिषद आणि नातेपुते नगर पंचायतसाठी गेल्या पाच दिवसापासून सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी चित्रा वाघ आल्या होत्या. यावेळी त्या बोलत होत्या.
शेकडो भगिनी करोनाच्या संकट काळातही आपल्या प्रश्नासाठी घरदार सोडून रस्त्यावर बसल्या आहेत. हे साहेबांनी होऊ दिले नसते. मात्र आज जे चालले आहे ते साहेबांच्या विचाराची राष्ट्रवादी असती तर झालं नसतं अशा शब्दांत, चित्रा वाघ यांनी टीका केली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्य़ावरील आपला विश्वास व्यक्त केला.
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर अकलूज आणि नातेपुते ग्रामपंचायतींना नगर परिषद आणि नगर पंचायत करण्यापासून रोखले जात असल्याचं आंदोलकांचं म्हणण आहे.