लॉकडाऊन शिथिल झाल्यानंर टीव्ही आणि चित्रपटांचे शूटिंग पुन्हा सुरू झाले आहे. दररोज, काही कलाकार सेटवरून आपले फोटो शेअर करीत आहेत आणि करोना युगातील शूट कसे चालू आहे हे सांगत आहेत. आता याच भागात अभिनेत्री सनी लिओनीने एक रंजक फोटो शेअर केला आहे. तो फोटो पाहून शूटिंग किती बदलला आहे हे स्पष्टपणे दिसत आहे.
सनी लिओनीने तिच्या डान्सचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सनी अन्य डान्सर्ससह डान्स करत आहे. या फोटोमधील गमतीची गोष्ट म्हणजे सर्व डान्सर्स फेस मास्क घातलेले आहेत आणि त्यांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवलेले आहे. यात फक्त सनी लिओनी मास्कशिवाय दिसत आहे. फोटोमध्ये सनीने टॉपसह मिनी स्कर्ट घातला आहे. ती कोणत्या गाण्याचे शूटिंग करत आहे हे सांगणे कठीण आहे, पण हा फोटो सध्या खूपच व्हायरल झाला आहे.
वर्ल्ड फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास सनी शेवटच्या वेळी “रागिनी एमएमएस-2′ या वेब सीरिजमध्ये झळकली होती. या वेब सीरिजला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. याआधीही सनीने अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे, पण तिला आतापर्यंत हे यश मिळालेले नाही.