Cement prices increased – घर बांधणीचा खर्च आता वाढणार आहे. सिमेंट कंपन्यांनी प्रति बॅग 20 ते 80 रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. COGENCIS ने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रात सिमेंटच्या प्रत्येक पोत्याच्या किमतीत 20 ते 40 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशात सिमेंटच्या पिशवीच्या दरात 30 ते 40 रुपयांची वाढ होणार आहे. ( cement price in Maharashtra)
तेलंगणामध्ये प्रति पोती 30 ते 40 रुपयांनी वाढ झाली आहे. कर्नाटकात 30 रुपयांनी प्रति बॅगने भाव वाढविण्यात आला आहे. तामिळनाडूमध्ये 50 रुपये ते 80 रुपये प्रति पिशवीच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
सिमेंट कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ –
दरात वाढ झाल्याच्या वृत्तानंतर सिमेंट कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. मंगळवारी (दि. 2 एप्रिल) अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडचे शेअर्स 61.40 अंकांच्या उसळीसह 10017.60 वर व्यवहार करत होते. हिमाद्री सिमेंट्सचा शेअर 1.85 अंकांच्या वाढीसह 94.56 वर व्यवहार करत होता.
अबुंजा सिमेंटच्या शेअर्समध्येही वाढ झाली आहे. अंबुजाचा शेअर 12.45 अंकांच्या उसळीसह 2 टक्क्यांनी वधारला. अंबुजाचा शेअर 633.90 रुपयांवर व्यवहार करत होता.
प्लांटचे उद्घाटन –
भारतातील सर्वात मोठ्या सिमेंट कंपन्यांपैकी एक असलेल्या श्री सिमेंटने आज आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील दाचेपल्ली गावात आपल्या नवीन प्लांटचे उद्घाटन केले. हा कंपनीचा नवीन एकात्मिक सिमेंट प्लांट आहे. या सिमेंट प्लांटची उत्पादन क्षमता वार्षिक ३० लाख टन (MTPA) आहे. नियोजित वेळेच्या सहा महिने आधी ते कार्यान्वित करण्यात आले. 2,500 कोटींहून अधिक रुपये गुंतवणुक करुन बांधले गेले आहे.