Amit Shah On Rahul Gandhi – देशभरात लोकसभा निवडणुकीची उत्सुकता आहे. विजय संपादन करण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये वक्तव्यांची मालिकाही जोर धरू लागली आहे. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींचा खरपूस समाचार घेतला आहे.
ते म्हणाले की, काॅंग्रेसचे हे युवा नेते अनेकदा सुट्टीसाठी परदेशात जातात; तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी अविश्रांत मेहनत घेत असतात. उत्तर बंगळुरू लोकसभा मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना शहा बोलत होते. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीला परिवारवाद्यांची युती असल्याचे म्हटले. । Amit Shah On Rahul Gandhi
कर्नाटकातील सर्व २८ लोकसभा जागा भाजप जिंकेल, असा विश्वास व्यक्त करुन शहा यांनी विरोधी पक्षांवर भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचा आरोप केला. ते म्हणाले की, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील भारत आघाडीमध्ये कोणतीही स्पर्धा नाही. । Amit Shah On Rahul Gandhi
‘अब की बार ४०० पार..’ – पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, “विकसित भारतासाठी ४०० पार, विकसित कर्नाटकसाठी ४०० पार, गरीबी कमी करण्यासाठी ४०० पार, दहशतवादावर प्रहार करण्यासाठी ४०० पार, भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाईसाठी ४०० पार,
शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी ४०० पार, तरुणांच्या उज्जवल भविष्यासाठी त्यांना नव्या संधीसाठी ४०० पार, अबकी बार ४०० पार, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. कर्नाटकमधील शिमोगा येथे सभेला संबोधित करताना मोदींनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला होता.