मुंबई – डिसेंबर अखेर संपलेल्या तिमाहीत अंबुजा सिमेंट कंपनीचा नफा मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे शुक्रवारी या कंपनीच्या शेअरच्या भावात सहा टक्क्यांपर्यंत घट झाली. डिसेंबर अखेर संपलेल्या तिमाहीत अंबुजा सिमेंट कंपनीचा नफा 55 टक्क्यांनी कमी होऊन तो केवळ 430 कोटी रुपये झाला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. गेल्या वर्षी तिसऱ्या तिमाहीत कंपनीला 968 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
कंपनीने शेअर बाजाराला कळलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, डिसेंबर अखेर संपलेल्या तिमाहीमध्ये देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रभाव होता. त्यामुळे मागणी कमी होऊन या तिमाहीत कंपनीचा महसूल कमी झाला आहे. आगामी काळामध्ये परिस्थिती सुधारण्याची शक्यता असल्यामुळे कंपन्यांचा नफा वाढेल असे कंपनीने म्हटले आहे.