ब्रुसेल्स – युरोपात करोना महामारीचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाल्याने तेथील नागरीकांचे आयुर्मान कमी झाले आहे असे आढळून आले आहे.
युरोपियन युनियन हा युरोपातील 27 देशांचा एक गट असून त्या समुदायाची आकडेवारी सादर करणाऱ्या युरोस्टॅट नावाच्या एका संस्थेने पहाणीनंतर हा निष्कर्ष मांडला आहे.स्पेन मध्ये सन 2019 च्या तुलनेत मनुष्याचे आयुर्मान एक वर्ष सहा महिन्यांनी कमी झाले आहे.
बल्गेरियातील हे प्रमाण 1 वर्ष 5 महिने इतके आहे. तथापि डेन्मार्क आणि फिनलंड मधील नागरीकांचे आयुर्मान मात्र 1 महिन्यांनी वाढल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. युरोपातील प्रत्येक देशाचा आकडा मात्र या पहाणीत अजून जाहीर करण्यात आला नाही.
तथापि सरासरी अभ्यास करताना युरोपातील नागरीकांचे आयुर्मान कमीच झाल्याचे दिसून येत आहे असे या संस्थेने म्हटले आहे.