पुणे – स्पेशल हॉलिडे/व्हेकेशन ओनरशीप सवलत संपूर्ण देशभर देण्याचे सांगून तब्बल 1 लाख 51 हजार रुपये स्विकारून ग्राहकाची फसवणूक करणे इंपेरियल क्रुस सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीला महागात पडले. कंपनी आणि दोन संचालकांना ग्राहकांचे घेतलेले पैसे वार्षिक 9 टक्के व्याजाने 22 एप्रिलपासून 2019 देण्यात यावेत.
याबरोबरच तक्रारदारांना नुकसान भरपाई म्हणून 25 हजार रुपये, तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रुपये देण्यात यावेत, असे अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणेचे अध्यक्ष जयंत देशमुख, सदस्य अनिल जवळेकर आणि शुभांगी दुनाखे यांनी आदेशात म्हटले आहे.
याबाबत गीतांजली शर्मा आणि संजीव शर्मा यांनी ऍड. पवनकुमाभर भन्साळी यांच्यामार्फत इंपेरियल क्रुस सर्व्हिसेस प्रा.लि आणि दोन संचालकांविरोधात 6 ऑगस्ट 219 रोजी ही तक्रार दाखल केली. इंपरियल क्रुस ही कंपनी क्लबच्या संदर्भात सेवा देण्याचा व्यवसाय करते.
कंपनीचा हिंजवडी येथे झियॉन मॉल आहे. तेथे खरेदीसाठी तक्रारदार 21 एप्रिल 2019 रोजी गेले होते. तेथे तक्रारदारांना लकी ड्रॉ कुपन देण्यात आले. कंपनीच्या प्रतिनिधींच्या सांगण्यावरून तक्रारदारांनी त्यात मजकुर भरला. 22 एप्रिल रोजी गीतांजली याना फोन आला. दहा लकी विनरपैकी त्या एक आहेत. गिफ्ट घेण्यासाठी ऑफीसला बोलविण्यात आले.
ऑफीसमध्ये केलेल्या सहली आणि सुट्यांची माहिती घेण्यात आली. स्पेशल हॉलिडे/व्हेकेशन ओनरशीप सवलत घेण्यास ते पात्र आसल्याचे सांगितले. ही सवलत देशभर असल्याचे सांग़ून, थ्री-फोर स्टार हॉटेलात मिळणार असल्याचे सांगितले. मात्र, या सवलतीसाठी 30 ते 45 दिवस आधी कळवण्यास सांगितले. तक्रारदारांना सभासद घेण्यास सांगितले.
त्यानुसार 22 एप्रिल 2019 रोजी 51 हजार रुपये, तसेच, 1 लाख रुपयांच धनादेश दिला. त्यानंतर तक्रारदारांना कोणतीच सेवा मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी ऍड. पवनकुमार भन्साळी यांच्यामार्फत ग्राहक मंचात धाव घेतली. नोटीस बजावून कंपनी अथवा संचालकांच्या वतीने कोणीही मंचात हजर राहिले नाही. त्यामुळे तक्रारदारांची बाजू ऐकुण घेत अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला असल्याचे सांगत मंचाने वरील आदेश दिला.