श्रीनगर – शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा येथील त्राल भागातील सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या सहाय्यकाला पकडले आहे. त्याच्याकडून चिनी हँड ग्रेनेडही जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या महितीच्या आधारे त्राल येथील सायदाबाद गावात अवंतीपोरा पोलिस, सीआरपीएच्या 180व्या बटालियने शोधमोहीम राबविली. यावेळी सय्यदाबाद पस्तूना येथील आमिर मोहम्मद अशरफ खानला ताब्यात घेण्यात सुरक्षा दलाला यश आले.
Awantipora police today arrested one person identified as Amir Ashraf khan and recovered a Chinese hand grenade from his possession which he had kept concealed in a plastic jar in the compound of his house: Jammu and Kashmir Police pic.twitter.com/muED5ZCRuE
— ANI (@ANI) December 25, 2020
त्याच्याकडून चिनी हँड ग्रेनेड जप्त करण्यात आला आहे. सुरक्षा दलाने त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले असून त्याच्याविरोधात त्राल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी गेल्या गुरूवारी सरक्षा दलाने अल-बदर दहशतवादी संघटनेच्या चार आणि बुधवारी जैशच्या सहा सहाय्यकांना ताब्यात घेतले होते.