‘चेहरे’मध्ये ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी

मुंबई – साऊथ अभिनेत्री कृती खरबंदा फार कमी वेळात साऊथ चित्रपटांसह बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिला पहिल्यांदा दक्षिणेतल्या सिनेमांमध्ये रोल मिळाला. लवकरच तिचा “पागलपंती’ चित्रपट सिनेप्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचबरोबर “चेहरे’ या आगामी चित्रपटात देखील वर्णी लागली होती. मात्र चर्चा आहे की, आपल्या नख-यांमुळे कृती हा चित्रपट हातचा गमावला. आता तिच्या जागी या चित्रपटात अंकिता लोखंडे या मराठ मोळ्या अभिनेत्रीची वर्णी लागली आहे.

 

View this post on Instagram

 

In a world of trends . Sometimes a girl just wants to wear Something classic 😻 #sareeisthesexiestattire

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on


“चेहरे’ या चित्रपटाचे  निर्माता आनंद पंडित यांनी अंकिताचे नाव फायनल केले आहे. कृती ला बाहेरचा रस्ता दाखवल्यावर आनंद यांनी अंकिताची भेट घेतली. अंकिताला चित्रपटाची कथा आवडली आणि तिने लगेच या चित्रपटाला होकार दिला.


दरम्यान, लवकरच अंकिता ‘बागी 3’ या सिनेमातही झळकणार आहे. अंकिताने ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटात तिने झलकारीबाईची भूमिका साकारली होती. लवकरच अंकिता ‘बागी 3’ या सिनेमातही झळकणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)