शिरूर -शिरूर तालुक्यात दररोजच करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे करोनाची साखळी काही केल्या तुटत नसल्याचे दिसून येत आहे. शिरुर शहरासह तालुक्यातील 15 गावांत 35 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
शिरूर ग्रामीणमध्ये बाबुरावनगर 3, तर्डोबावाडी येथील वरपेनगर 2, शिरूर शहरात 7, सणसवाडी 4, विठ्ठलवाडी 1, शिक्रापूर 5, मलठण 2, धामारी 1, जातेगाव खुर्द 2, डिंग्रजवाडी 2, वाडा पुनर्वसन 1, कोरेगाव भीमा 2, सादलगाव 1, धानोरे 1, रांजणगाव गणपती 1, असे 15 गावांत 32 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.शिरूर तालुक्यातील करोना बाधितांचा आकडा 625 एवढा झाला आहे.
करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांना होम क्वारंटाइन न ठेवता त्यांना शासकीय जागेमध्ये क्वारंटाइन ठेवणे गरजेचे आहे. कारण असे अनेक क्वारंटाइन नागरिक खुलेआम गावांमध्ये प्रवास करताना फिरताना दिसत आहे. अशा नागरिकांवर आता शासनाने नजर ठेवणे गरजेचे आहे.