चिंबळी-निघोजे येथे आतापर्यंत 58 बाधित आढळले आहेत. त्यापैकी 43 जणांनी करोनावर मात केली असून 15 जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी व्ही. एस. गाडीलकर व पोलीस पाटील राहुल फडके यांनी दिली.
बाधितांमध्ये 85 टक्के स्थानिक तर 10 टक्के भाडेकरू आहेत. खेड पंचायत समिती आरोग्य विभागाच्या वतीने करजंविहीरे केंद्राच्या अंतर्गत निघोजे येथील प्राथमिक उपकेंद्राच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत.
मोई येथे आढळलेल्या 15 रुग्णांपैकी 10 जण करोनामुक्त झाले असून 5 जण उपचार घेत आहेत. चिंबळीत 31 बाधित आढळले असून त्यामध्ये 10 क्वारंटाइन तर 6 जणांवर उपचार सुरू असून 15 जणांनी करोनावर मात केली आहे. कंटेन्मेंट झोनमधील रस्ते सील करण्यात येत आहेत.