खालापूर – बोरघाटाचे जनक म्हणून ओळखले जाणाऱ्या वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचा उत्सव सोमवारी (दि.1) उत्सव देवस्थान कमिटीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करणयात आली. तत्कालीन पशू संवर्धन दुग्धपालन व मत्सविकास मंत्री महादेव जानकर यांनी वीर हुतात्मा शिंग्रोबाचा उत्सव 15 वर्षापूर्वी सुरू केला. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शिंग्रोबा देवस्थान कमिटीच्या वतीने आजही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.
सोमवारी सकाळी 6 ते 8 महाअभिषेक व होमहवन, सकाळी 8 ते 9 श्री सत्यनारायण महापूजा, देवस्थान कमिटीचे संस्थापक तथा आदर्श सरपंच बबन खरात यांच्या हस्ते करण्यात आली. सकाळी 9 ते 11 शिंग्रोबा देवाची पालखी शिळफाटा येथून खोपोली बाजारपेठेतून शिंग्रोबा मंदिरापर्यंत डीजेच्या तालावर फटाक्याच्या आतिषबाजीत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली होती. सकाळी 10 ते 12 रायगड भूषण हभप काशिनाथ महाराज वाघुले यांची कीर्तनरुपी सेवा, दुपारी 1 वाजता मान्यवरांचा सत्कार व स्वागत सोहळा, दुपारी 2 ते 3 महिलांसाठी हळदी कुंकू, दुपारी 2 ते 5 महाप्रसाद, दुपारी 3 वाजता गजानृत्य तसेच 6 वाजता शिग्रोंबा मंदिर येथे महाआरतीने सोहळ्याची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या ठिकाणी दुपारी रायगड भूषण ह.भ.प.काशिनाथ महाराज वाघुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी कीर्तन सेवेच्या माध्यमातून धनगर वीर हुतात्मा शिंग्रोबांचा इतिहास समाज बांधवांसमोर मांडला.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी देवस्थान कमिटीचे संस्थापक अध्यक्ष भरत कोकरे, संस्थापक बबन शेडगे, बबन खरात, बाळासाहेब झोरे, बाळासाहेब आखाडे, दीपक आखाडे, नामदेव हिरवे आदी प्रमुखांसह उत्सव कमिटीचे बबन जानकर, रामभाऊ कोकरे, दत्ता शेडगे, लक्ष्मण बावधाने, बाळासाहेब आखाडे, पांडुरंग झोरे, भिमा शिंगाडे, धाऊ आखाडे, राम शेडगे, एकनाथ घाटे, इश्वर गोरे, बापू बावधने, मारुती शेडगे, विठ्ठल बोडेकर, रामदास जानकर, संतोष गोरे, बाळू शेडगे, भाऊ शेडगे पदाधिकारी सदस्यांनी व समाज बांधवांनी मेहनत घेतली .