अहमदाबाद – गुजरातच्या नवसारी जिल्ह्यात शनिवारी भीषण अपघात घडला. बसचालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे बस समोरून येणाऱ्या एसयुव्ही कारला जाऊन धडकली. यात 9 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे.
हा अपघात मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घडला. चालत्या गाडीत बसचालकाला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या कारला धकड बसली. या अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 28 पेक्षा जास्त प्रवासी जखमी आहेत. अपघातानंतर जखमींना नवसारी येथील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर गंभीर जखमी प्रवाशांवर सूरतच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे.