कंगणा रणावत सध्या मध्यप्रदेशात “धाकड’चे शुटिंग करते आहे. यामध्ये कंगणा एका गुप्तहेर महिलेच्या रोलमध्ये दिसणार आहे. त्यात तिला दे दणादण ऍक्शनचे सीन देखील असणार आहेत. ‘धाकड’च्या वेगवेगळ्या रोलमधील कलाकारांचे फर्स्ट लुक काही दिवसांपूर्वीच सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाले आहेत.
‘धाकड’मधील ऍक्शन सीनच्या शुटिंगसाठी भरमसाठ खर्च केला गेला आहे, असे कंगणाने अलिकडेच सांगितले. एका सीनची तयारी दिवसभर सुरू होती आणि रात्री त्याचे शुटिंग होणार असल्याचे कंगणाने सांगितले. एखादा डायरेक्टर एखाद्या सीनसाठी एवढी मेहनत घेत असल्याचे आपण यापूर्वी कधी बघितले नव्हते. या एका सीनसाठी तब्बल 20 कोटी रुपये खर्च झाले.
“धाकड’मधील एकूण ऍक्शन सिक्वेन्ससाठी तब्बल 25 कोटी रुपये खर्च झाल्याचेही तिने सांगितले. “धाकड’च्या आगोदर कंगणाने “थलायवी’चे शुटिंग पूर्ण केले आहे. धाकड’साठी विश्वविख्यात फोटोग्राफी डायरेक्टर तेत्सुओ नगाता हे फोटोग्राफी डायरेक्शन करत आहेत. नगाता मूळचे जपानी पण फ्रेंच डायरेक्टर आहेत. त्यांनी जेवढे ऍवॉर्ड मिळवले आहेत. त्यावरून त्यांच्या आंतरराष्ट्रीय किर्तीला साजेसे बजेट ठेवणे क्रमप्राप्त असल्यानेच ‘धाकड’च्या निर्मात्यांनी खर्चाची तयारी ठेवली आहे. “धाकड’मध्ये कंगणाबरोबर अर्जुन रामपाल व्हिलनच्या रोलमध्ये असणार आहे. त्याशिवाय दिव्या दत्ताही एका खास रोलमध्ये असणार आहे.