मुंबई – भाजप नेत्या पंकजा मुंडे कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या आधी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. पंकजा मुंडे पक्षावर नाराज असल्याच्या चर्चाही गेल्या वर्षभरापासून सुरु आहे अशात अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकार सोबत येत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यांच्याबरोबर ९ मंत्रांनी शपथ घेतली.
अशात, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच मतदार संघातील प्रतिस्पर्धी, शिवाय नात्याने भाऊ बहीण, यामुळे त्यांच्यातील संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. बीड आणि परळीतील विकास कामांवरून दोन्हही नेत्यांमध्ये सतत खडाजंगी देखील होत असते. परंतु हे सर्व राजकीय भाव बाजूला ठेऊन पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेत घेतली आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यानंतर आज पंकजा मुंडे यांनी भावाची गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या आहे तसेच पंकजा मुंडे यांनी भावाचं औक्षण केलं आहे.