पुणे – औंध येथील महादजी शिंदे रोडवरील डी-मार्ट शेजारील पुलाला भगदाड पडले आहे. यामुळे पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. तसेच राजीव गांधी पुलाभोवती देखील मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे हा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे पुणे शहराकडून पिंपरी-चिंचवड कडे जाणाऱ्या वाहनांनी औंध मार्गे जाणे टाळावे.
दरम्यान, औंध भागामध्ये रात्री पासूनच शंकराच्या मंदिरापर्यंत पाणी आले होते. तसेच वाघाचा घाट पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. दुपारनंतर पाण्याची पातळी वाढल्यामुळे पाणी राजीव गांधी पुलाच्या कडेला साठत होते. त्यामुळे प्रमुख रस्त्यावर पाणी साठल्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम झाले होते.