खळद – खळद (ता.पुरंदर) येथील कऱ्हा नदीपात्रातन वृद्ध महिला वाहून गेल्याचे समजत आहे. कौशल्या चंद्रकांत खळदकर असे वृद्ध महिलेचे नाव आहे.
माहितीनुसार, कौशल्या नदीपात्रात सकाळी 10 वाजता कपडे धुण्यासाठी गेल्या असता पाय घसरल्याने नदीपात्रात वाहून गेल्या. यावेळी त्यांच्या बाजूला असलेल्या महिलांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्या वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शी महिलांनी सांगितले. यावेळी स्थानिक युवक त्यांचा शोध घेण्यात प्रयत्न करत आहेत. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शोध घेण्यास अडचण येत असून राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला पाचारण केले असल्याचे सासवड पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांनी सांगितले.
माझ्या आईचा शोध कसा लागणार? प्रत्येक जण येऊन फक्त पाहून जात आहे. दोन तास झाले असून अजून शोध कार्य सुरू झाले नसल्याने वृद्ध महिलेच्या मुलाने हतबल होऊन प्रश्न केला आहे.