मुंबई – आपल्या मजेदार स्टाईलने सर्वांना हसवणाऱ्या ‘भारती सिंह’ने सगळ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. भारती सिंहने काल (रविवारी) एका चिमुरड्याला जन्म दिला आहे. इन्स्टाग्रावर पोस्ट करत भारतीचा पती हर्ष लिंबाचियानं ही गूडन्यूज सगळ्यांना दिली आहे. सध्या कलाक्षेत्रातून आणि तिच्या फॅन्स कडून भारती आणि पत्ती हर्ष लिंबाचिया यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरसह राहुल वैद्यनंही भारती आणि हर्ष यांना शुभेच्छा दिल्या आहेत. काही आठवड्यांपूर्वी भारतीनं आपल्या इन्टाग्रावरुन येणाऱ्या मुलाची आई, असं कॅप्शन करत फोटो पोस्ट केले होते. तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
View this post on Instagram
नवव्या महिन्यातही शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या भारतीबाबत दोन दिवसांपूर्वीच एक अफवा पसरली होती. भारतीनं एका मुलीला जन्म दिला असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र अखेर ही बातमी खोटी असल्याचं नंतर स्पष्ट झालं होतं. आणि आज भारती खरंच आई झाली असून, तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.