संगमनेर: संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा शिवारातील शेतातील विहिरीत अंदाजे 35 वर्षे वयाच्या अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. शुक्रवारी (12 एप्रिल) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उघडकीस आलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. हिवरगाव पावसा येथील बापूसाहेब भिकाजी जाधव यांना त्यांच्या शेतातील विहिरीतील पाण्यावर तरंगताना अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला.
शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी जावून विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. मयताच्या अंगात काळ्या रंगाचा टी-शर्ट व राखाडी रंगाची पॅन्ट होती, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे.