नगर तालुक्‍यात स्वाईन फ्लूचा आठवड्यात दुसरा बळी

सारोळा कासार येथील प्रा. यशवंत धामणे यांचे निधन

चिचोंडी पाटील: स्वाईन फ्लूची लागण होऊन नगर तालुक्‍यातील सारोळा कासार येथील रहिवासी व अकोळनेर येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील शिक्षक प्रा. यशवंत ऊर्फ बंडू दत्तात्रय धामणे (वय 49) यांचे नुकतेच पुणे येथे रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले आहे. नगर तालुक्‍यातील एकाच आठवड्यात स्वाईन फ्लूचा हा दुसरा बळी आहे.

प्रा. धामणे यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निदान झाल्यावर त्यांना उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुमारे 17 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचाराचा खर्च मोठा असल्याने ग्रामस्थांसह रयतच्या विविध शाखांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मदत निधीही जमा केला होता. मात्र उपचार सुरु असताना शनिवारी (दि. 6) पासून त्यांची प्रकृती ढासळली आणि बुधवारी (दि.10) दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात वडील, दोन बंधू, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

प्रा. धामणे यांच्याचबरोबर अकोळनेर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात काम करणारे कर्मचारी नितीन सदाशिव गायकवाड यांनाही स्वाईन फ्लूची लागण झाली होती. त्यांच्यावर पुणे येथील ससून रुग्णालयात स्वाइन उपचार सुरु असताना मागील रविवारी (दि. 7) हृदयविकाराच्या झटक्‍याने त्यांचे निधन झालेले आहे. त्यामुळे एकाच आठवड्यात नगर तालुक्‍यात एकाच शाळेत काम करणाऱ्या दोघांचा स्वाईन फ्लूमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.