नागपूर : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अनेक राजकीय चर्चा सुरू झाल्या. यात अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यात चर्चा सुरू झाली.
मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदेच २०२४पर्यंत मुख्यमंत्री राहणार असल्याचे सांगून या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत शिंदे यांनी आमदारांना आश्वस्त केले. शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई यांनीही, शिंदेच मुख्यमंत्रिपदी राहतील, असे शिवसेना आमदारांच्या बैठकीनंतर सांगितले.