मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज कोरोना लसीबाबत मोठी घोषणा केली आहे. कोरोना विषाणूवरील पहिली लस तयार झालेली असून ती आज लाँच करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुतीन यांच्या मुलीला हि लस देण्यात आली आहे.
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूवरील लसीच्या प्रतीक्षेत संपूर्ण जग असताना पुतीन यांनी जगातील पहिली कोरोना लस तयार झाल्याची केलेली घोषणा यावेळची सर्वात महत्वाची आणि आनंददायक बातमी आहे. एएफपी या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे. लसीला आरोग्य मंत्रालयाकडून मान्यता असून रशियानं केलेला दावा खरा असेल तर ही लस जगातील पहिली कोरोना लस ठरेल .
मॉस्कोमधल्या सरकारी संशोधन केंद्रात अर्थात गामालेया इन्स्टिट्यूट इथे कोरोनावरील लस तयार करण्याचे काम सुरू होते . जुलै महिन्यात माणसांवर या लशीची चाचणी घेण्यात आली. ऑगस्टमध्ये लशीची मोठ्या प्रमाणावर चाचणी घेण्यात येईल, असे त्यांच्यातर्फे सांगण्यात आले होते .
#BREAKING Russia has developed ‘first’ coronavirus vaccine: Putin pic.twitter.com/s33LTMO0j0
— AFP news agency (@AFP) August 11, 2020
#BREAKING Putin says daughter inoculated with new Russian coronavirus vaccine pic.twitter.com/tGA9E81BmU
— AFP news agency (@AFP) August 11, 2020
लवकरच मोठ्या प्रमाणात लसीचे उत्पादन सुरू करण्यात येईल असं वृत्त रशिया टुडे ने दिलेले आहे. सुरुवातीला ही लस आरोग्य सेवक, डॉक्टर आणि अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे, त्यानंतर जानेवारीपासून ही लस सर्वांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
“ही लस प्रभावीपणे काम करते. तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवते, आणि मी पुन्हा सांगतो की, या लसीने सर्व महत्त्वाच्या चाचण्या पार केल्या आहेत,” असं पुतिन यांनी म्हटलेलं आहे.