विवाहोत्सुकांना ‘क्‍वाक-क्‍वाक’ अ‍ॅपचा आधार

बंगळुरू – लॉकडाऊनमुळे सहा महिन्यांपासून विवाहोत्सुक मंडळींना परस्परांशी संपर्क साधणे अवघड झाले आहे. या परिस्थितीत देशांतर्गत तयार केलेल्या क्‍वाक-क्‍वाक अ‍ॅपला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

तरुण-तरुणींना परस्परांची ओळख करून घेण्यासाठी बंगलोर येथील कंपनीने नावाचे क्‍वाक- क्‍वाक ऍप सुरू केले आहे. या ऍपची उपयोगिता पाहून सध्या एक कोटी लोकांकडून हे अ‍ॅप वापरले जात आहे.

क्‍वाक-क्‍वाकचे संस्थापक रवी मित्तल यांनी सांगितले की, गेल्या दोन महिन्यांपासून आमचे डाऊन लोड वेगाने वाढत आहेत. या दोन महिन्यांत 10 लाख लोकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. लॉकडाऊनमुळे या अ‍ॅपचा वापर वाढत आहे. आगामी काळातही या अ‍ॅपमध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत. आम्हाला सध्या भांडवलाची कमतरता नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.