सायकल शरीरासाठी उत्तम व्यायाम – जॅकी श्रॉफ

तळेगाव दाभाडे – प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. येणाऱ्या पिढीला चांगले आरोग्य देणे, ही आपली जबाबदारी आहे. चांगल्या आरोग्यासाठी उत्तम आहाराबरोबरच चांगला व्यायामही आवश्‍यक आहे आणि सायकल चालविणे हा शरीरासाठी उत्तम व्यायाम आहे, असे मत नामवंत अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी व्यक्‍त केले.

पुलवामा हल्ल्याच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आमदार सुनील शेळके फाउंडेशन व रोटरी क्‍लब ऑफ तळेगाव सिटी यांच्या वतीने सद्‌भावना सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

कार्यक्रमास आमदार सुनील शेळके, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) पोलीस महानिरीक्षक संजय लटकर, उपमहानिरीक्षक बिपेंद्र टोपो, रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्‍ट 3131 चे प्रांतपाल अनिल परमार, सहायक प्रांतपाल गणेश कुदळे, रोटरी क्‍लब तळेगाव दाभाडे सिटीचे अध्यक्ष संतोष शेळके, संस्थापक विलास काळोखे, प्रकल्पप्रमुख दिलीप पारेख, सचिव दीपक फल्ले, संयोजन समिती सदस्य सुरेश शेंडे, किरण ओसवाल, विजय कदम, शरयू देवळे, रेश्‍मा फडतरे, नारायण मालपोटे, शाहीन शेख, वैशाली खळदे, संजय मेहता, नितीन शहा, मनोज ढमाले, बाळासाहेब रिकामे तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार शेळके म्हणाले की, आजही “तो’ दिवस आठवला तरी जवानांचे बलिदान आठवून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहात नाही. देशासाठी जवानांनी केलेले बलिदान कधीही विसरले जाणार नाही. शहीद जवान आणि त्यांच्या परिवारांविषयी सद्‌भावना व्यक्‍त करण्यासाठी रॅलीचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.

या सद्‌भावना सायकल रॅलीमध्ये 1100 विद्यार्थी व युवक-युवतींनी भाग घेतला होता. तळेगाव दाभाडे येथील मारुती मंदिर चौकातून रॅलीचा प्रारंभ झाला. तेली आळी, बाजारपेठ, गणपती चौक, शाळा चौक, जिजामाता चौक, नगर परिषद, हिंदमाता भुयारी मार्ग, इंद्रायणी महाविद्यालय, स्टेशन चौक, जिजामाता चौकमार्गे मारुती मंदिर चौकात रॅलीचा समारोप झाला.

संतोष शेळके यांनी प्रास्ताविक केले. दिलीप पारेख यांनी आभार मानले. सूत्रसंचालन अनिल धर्माधिकारी यांनी केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.