Jackie Shroff Troll| बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफ अभिनयासह त्यांच्या हटके स्टाइलसाठी खास करून ओळखले जातात. सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्याच्या डोक्यात एक चापट मारत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. हे पाहून चाहत्यांनी जॅकी श्रॉफ यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये जॅकी श्रॉफ यांच्या आजूबाजूला अनेक लोक थांबलेले दिसत आहेत. जॅकी हे हातात रोपे घेऊ उभे असताना त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी त्यांचा एक चाहता त्यांच्याजवळ जातो. मात्र त्या चाहत्याच्या डोक्यावर जॅकी श्रॉफ जोरदार टपली मारतात. तर दुसरा चाहता सेल्फी काढताना त्यालाही जॅकी श्रॉफ मारत असल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. जॅकी श्रॉफ यांची ही कृती नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलेली नाही. Jackie Shroff Troll|
व्हायरल व्हिडीओत जॅकी श्रॉफ सेल्फी घेणाऱ्या चाहत्याला “खाली हात काय ठेवतोय, असा हात ठेवायचा,” असे म्हणताना दिसत आहे. मुळात हे सर्व जॅकी श्रॉफ मस्करीत करत आहेत. परंतु त्यांची ही कृती अनेकांना आवडलेली नाही. त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. Jackie Shroff Troll|
जॅकी श्रॉफ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, काही दिवसांपुर्वी त्यांचा ‘मस्त मे रहने का’ सिनेमा प्रदर्शित झाला होता.या चित्रपटाचं दिग्दर्शन विजय मौर्य यांनी केले आहे. या सिनेमात त्यांच्यासोबत नीना गुप्ताही होत्या. हा सिनेमा प्राईम व्हिडीओ या ओटीटीवर रिलीज झाला. जॅकी श्रॉफ लवकरच वरुण धवनसोबत ‘बेबी जॉन’ सिनेमात झळकणार आहेत.
हेही वाचा :