जिल्हा परिषद विषय समिती बैठकीत निर्णय
सातारा – जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या योजनांमधील लाभार्थ्यांच्या निवडीला अखेर समाजकल्याण समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या बैठकीत रिक्त पदे भरण्याबाबतही चर्चा झाली.
समाजकल्याण समितीची सभा सभापती शिवाजी सवगौड यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
समाजकल्याण विभागाच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभार्थी निवडीस विलंब होत आहे. या निवडी तात्काळ कराव्यात, अशी मागणी सदस्यांनी या बैठकीत केली. सदस्यांच्या भावनांचा विचार करून या निवडी लगेच करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषदेचा 20 टक्के निधी आणि दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत लाभार्थी निवडी करण्यास या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
प्रारंभी मागील सभेचा कायृवत्तांत वाचून कायम करण्यात आला. शासनाकडून आलेले निर्णय आणि परिपत्रकांचे अवलोकन करण्यात आले. बैठकीस डॉ. अभय तावरे, रमेश पाटोळे, रेश्मा शिंदे, मधू कांबळे, रंजना डगळे, मंगला गलांडे, भावना सोनवलकर, कल्पना खाडे, उषादेवी गावडे, समाजकल्याण अधिकारी हरेश्वर डोंगरे उपस्थित होते.