मुंबई पालिकेत महाविकास आघाडी पॅटर्नची नांदी

मुंबई  – मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या सेनेकडेच राहिल्या आहेत. मुंबई महापालिकेत राज्यातील महाविकासआघाडी पॅटर्न दिसून आला. शिवसेनेचे यशवंत जाधव यांची चौथ्यांदा स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस, समाजवादी पार्टीने शिवसेनेला पाठिंबा दिला. तर, कॉंग्रेसने त्यांचा उमेदवार मागे घेतल्याने भाजप उमेदवार पराभूत झाला.

मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीत शिवसेनेला राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षाने पाठिंबा दिला होता. तर कॉंग्रेसने आपला अर्ज मागे घेत सेनेला अप्रत्यक्ष मदत केली. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये एकूण 27 सदस्य आहेत. त्यापैकी 22 जणांनी मतदानात सहभाग घेतला. कॉंग्रेसचे स्थायी समितीमध्ये 3 सदस्य आहेत. ते स्थायी समिती निवडणुकीत तटस्थ राहिले आहेत.
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या यशवंत जाधव यांना 14 तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार राजश्री शिरवाडकर यांना 8 मते मिळाली आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.