पुतीनच ठरलेत रशियातील सगळ्यांत देखणा पुरूष

मॉस्को – रशियन जनतेला देशातील कोणती व्यक्ती सर्वात सुंदर वाटते यासंदर्भात सुपरजॉब डॉय आरयू नावाच्या वेबसाइटकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये अनेकांनी राष्ट्रपती ब्लादीमीर पुतीन यांच्या नावाची निवड केली आहे. सर्वेक्षणातील 18 टक्के पुरुषांनी तर 17 टक्के महिलांनी पुतीन यांची निवड केली. पुतीन हेच रशियन जनतेच्या मनात आजही देशातील सर्वात सुंदर व्यक्ती असल्याचे चित्र या सर्वेक्षणातून दिसून आल्याचे वेबसाइटने सर्वेक्षणात म्हटले आहे.

मॉस्को टाइम्सने सुपरजॉबच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार पुतीन यांच्या लोकप्रियतेसमोर सर्वच रशियन कलाकार, नेते आणि खेळाडू या सर्वेक्षणामध्ये फिके पडल्याचे पहायला मिळाले. वेळोवेळी मासे पकडताना, घोड्यावर स्वार झालेले पुतीन यांचे अनेक फोटो समोर आले आहेत. 

या फोटोंमध्ये पुतीन हे शर्टलेसच दिसून येतात. पुतीन यांनी एका मुलाखतीमध्ये आपल्याला या शर्टलेस फोटोंबद्दल लज्जास्पद असे काही वाटत नसल्याचे म्हटले होते. पुतीन यांना या फोटोंमध्ये एक शक्तीशाली व्यक्ती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

या सर्वेक्षणामध्ये प्रत्येकाला एका प्रश्नांची यादी देण्यात आली होती. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 19 टक्के पुरुषांनी स्वत:लाच रशियामधील सर्वात सुंदर पुरुष असल्याचे मत दिले होते. तर 18 टक्के महिलांनी रशियामध्ये सुंदर पुरुषच नसल्याचे मत दिले होते.

पुतीन यांच्यानंतर रशियातील सर्वात देखण्या पुरुषांच्या यादीत अभिनेता दिमित्री नागियेव यांचा समावेश आहे. त्यानंतर डॅनिला कोजलोव्स्की आणि कॉन्साटंटिन खाबेन्सिकी यांचा क्रमांक असून या सर्वांमध्ये दोन ते तीन टक्के मतांचा फरक दिसून येतो. 

रशियामधील 300 शहरांमधून हजार पुरुष आणि दोन हजार महिलांनी या सर्वेक्षणामध्ये आपला सहभाग नोंदवला. पुतीन यांनाच या सर्वेक्षणामध्ये 10 टक्‍क्‍यांहून अधिक मते मिळाल्याचा दावा वेबसाइटने केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.