मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मंत्री. नवाब मलिक यांनी “पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त” म्हणत एनसीबीचे मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावरील हल्लाबोल कायम ठेवला आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती माध्यमांसमोर मांडली. तसेच क्रुजवरील व्हिडीओ शेअर करत मलिक यांनी आधी उल्लेख केलेल्या दाढीवाल्या व्यक्तीचं सत्य समोर आणल आहे.
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील दाढीवाल्या व्यक्तीवर मलिक यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्याची माहितीही त्यांनी दिली. त्या व्यक्तीचे नाव काशिफ खान असे असून हा मोठा ड्रग पेडलर असल्याचा दावा मलिक यांनी केला. शिवाय हा व्यक्ती अवैध सेक्स रॅकेट, पॉर्नोग्राफी चालवत असल्याचे ते म्हणाले. काशिफ खान हा समीर वानखेडेचा चांगला मित्र आहे. अनेक अधिकाऱ्यांनी काशिफ खानवर कारवाईचा प्रयत्न केला असता त्यांना रोखण्याचे काम वानखेडे यांनी केल्याचे समोर आले आहे.
Video of Kashif khan dancing on the Cruise ship pic.twitter.com/JoSsYF9Ux1
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 29, 2021
मलिक यांनी काशिफ खान यांचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. काशिफ खान फॅशन टीव्हीचे एमडी आहेत. कॉर्डिएला क्रूझ जहाजावर काशिफ खानने पार्टी आयोजित केली होती. नवाब मलिक यांनी याआधी क्रूझ जहाजावरील दाढीवाल्या व्यक्तीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. तसेच तो आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया असल्याचं म्हटलं होतं.