मोदींना स्वतःच्या गुरुचा मान ठेवता आला नाही : राहुल गांधी

उत्तराखंड : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका करताना भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची नरेंद्र मोदी यांनी कुचंबणा केली असल्याचा आरोप लावला. उत्तराखंड येथे आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर सभेमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी हे आरोप लावले असून ते म्हणाले, “पंप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेला हिंदू धर्माचे ज्ञान वाटत फिरतात मात्र हिंदू धर्मामध्ये सर्वोच्च स्थान असलेल्या गुरुचाच त्यांना विसर पडला असल्याचं चित्र आहे. अडवाणी हे मोदींचे गुरु असून आपण त्यांची पक्षातील दयनीय अवस्था पाहत आहोत. अडवाणींना स्टेजवरून लाथ मारून खाली उतरवण्यात आलंय.”

१९९१ पासून गुजरातमधील गांधीनगर लोकसभा निवडणूक मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या लालकृष्ण आडवाणी यांना यंदा पक्षनेतृत्वाकडून लोकसभेचे तिकीट देण्यात आले नसून त्यांच्या जागी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे आता गांधीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपकडून उचलण्यात आलेल्या या पावलावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत असून पंतप्रधान मोदींनीच अडवाणींचे तिकीट कापले असल्याचे आरोप होत आहेत.  मात्र भाजपकडून हे आरोप नाकारण्यात आले असून ७५ वर्षांपुढे वय असणाऱ्या नेत्यांना तिकीट नाकारणे ही भाजपची कार्यपद्धती असल्याचा निर्वाळा करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.