वाद पेटला ! आशिष शेलार गप्प का?

मुंबई – उर्मिला मातोंडकरने मांडलेल्या थेट मतावर कंगना रणौतने अत्यंत खालच्या पातळीवरची  टीका करत ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ म्हंटले आहे.  या टीकेनंतर कंगनावर बॉलिवूडमधून टीकेची झोड उठली. हा वाद आता चांगलाच पेटलेला दिसून येत आहे.  महाराष्ट्रातूनही अनेकांनी संताप व्यक्त केला होता. याच मुद्यावरून काँग्रेसनं भाजपावर निशाणा साधला असून, भाजपाचे नेते आशिष शेलार यांना त्यांच्या मौनावरून सवाल केला आहे.

कंगना रणौतने अत्यंत खालच्या पातळीवरची टीका महाराष्ट्राची कन्या उर्मिला मातोंडकर यांच्याबद्दल केली मात्र, याबाबत महाराष्ट्र भाजपानं साधा निषेधाचा शब्दही काढला नाही. मतदारयादीत तिचे नाव वांद्रे पश्चिम मतदारसंघात असतानाही ती शिवसेनेला मतदान केले असे खोटे सांगते. आशिष शेलार गप्प का?,” असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला आहे.

तत्पूर्वी,  बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई पोलीस आणि मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यानंतर तिच्या विरोधात टिकेची झोड उठली गेली. यात शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना असा कलगीतुरा चांगलाच रंगला होता त्यावेळी  भाजप नेते आशिष शेलार यांनी  कंगनाला पाठिंबा देत शिवसेनेवर टीका केली होती मात्र, यावेळी  कंगना रणौतने अत्यंत खालच्या पातळीवरची टीका महाराष्ट्राची कन्या उर्मिला मातोंडकर झाल्यावर  आशिष शेलार गप्प का?,” असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.