पुणे: जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज दुपारी 11.30 वाजता जिल्हा परिषद पुणे येथे ढोंगी कारभाराचा तीव्र निषेध आंदोलन करून करण्यात आले.
पंचायत समितीची खेडची नवीन प्रशासकीय इमारतीला लोकप्रतिनिधीनी विरोध केल्याचा आरोप करीत जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर नंदीबैल आणि पारंपारिक जागरण गोंधळ घालून जिल्हा परिषदेला जाग आणली जाणार आहे.
शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य या आंदोलनात सहभागी झाले