पुणे – एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी बस सेवा बंद ठेवली आहे. एकीकडे उच्च न्यायालयाने संप थांबविण्याचा आदेश दिलेला आहे, तर दुसरीकडे संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे.
पुण्यात सुद्धा आंदोलनाची तीव्रता वाढली असून, एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, स्वारगेट डेपोतील काम बंद आंदोलन करणाऱ्या 14 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. या 14 जणांना हातात नोटीस दिली आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची तीव्रता वाढली आहे.
दोन दिवसांपूर्वी राज्यभरातील 16 विभागातील 45 आगारामधील 376 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तर, आज रत्नागिरी जिल्ह्यातील 28 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे. या कारवाईनंतर निलंबीत कर्मचारी आक्रमक झाले आहेत.