मुंबई : महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मागील दिवसांपासून ड्रग्स प्रकरणावरून आरोप करताना दिसत आहेत. त्यातच आता त्यांच्यावर ईडीची कारवाई होताना दिसत आहे. त्यांच्या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या वक्फ बोर्डाशी संबंधित पुणे घोटाळ्याची ईडीने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी ईडीने ईसीआयआर नोंदवला आहे. पुण्यात एकूण ७ ठिकाणी ईडीने छापे टाकल्याचे सांगण्यात येत आहे.
यावरुनच आता मलिक यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवर टीकास्त्र सोडले आहे. यासंदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आज ते म्हणाले, “कालपासून माध्यमांद्वारे अफवा पसरवण्याचे काम सरकारी तपास यंत्रणांनी सुरु केले आहे. वक्फ बोर्डाच्या कार्यालयांवर छापे पडले आहेत, नवाब मलिक अडचणीत आले आहेत. पण मी ईडीच्या लोकांना हे सांगू इच्छितो, तुम्ही अफवा पसरवण्याचं काम बंद करा. पत्रकार परिषदा घेऊन किंवा प्रेसनोटद्वारे खऱ्या बातम्या द्या. बातम्या लीक करुन नुसता दंगा निर्माण करुन नका. मालकांना खूश करण्यासाठी हा खेळ खेळला जात आहे, मला माहित आहे”.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या कोणत्याही कार्यालयावर छापे पडले नाहीत, याबाबत चुकीची माहिती प्रसारित होत आहे.मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेल्या पुणे जिल्ह्यातील एका संस्थेवर #ED मार्फत छापा पडल्याची माहिती मिळाली आहे, असे स्पष्टीकरण अल्पसंख्याक विकास मंत्री @nawabmalikncp यांनी दिले. pic.twitter.com/Qt5YA7xRoj
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 11, 2021
ते पुढे म्हणाले, “ज्या अधिकाऱ्याला असं वाटतंय की त्यांच्या मालकांनी सांगितले की, नवाब मलिक घाबरेल. मी त्यांना सांगतो की नवाब मलिक कोणाला घाबरत नाही, घाबरणार नाही. चोरोंने है ललकारा, मिलेगा जवाब करारा. मी स्पष्ट सांगतो, या प्रकारामुळे नवाब मलिक घाबरणार नाही. चोरांविरोधात ही लढाई सुरू केली आहे, ती शेवटपर्यंत चालेल”.
#ED ने आज छापा टाकलेल्या संस्थेवरही वक्फ मंडळाच्या पुढाकाराने आधीच कारवाई केली आहे. गैरव्यवहार करणाऱ्या संस्थांवर #ईडी कारवाई करत असेल तर त्याचे निश्चितच स्वागत करु. पण याच्या आधारे #वक्फ मंडळाची किंवा व्यक्तिश: माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करु नये- मंत्री @nawabmalikncp
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 11, 2021
मनी लाँड्रिंग प्रकरणी हे छापे टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. वक्फ जमीन प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे हा तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.