मुंबई – भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि ग्लॅमरस अभिनेत्री ‘त्रिशाकर मधु’ तिच्या म्युझिक व्हिडीओ आणि बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, सध्या ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. त्रिशाकर मधुचा एक एमएमएस व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशलवर त्रिशाकर मधु ला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं आहे. मात्र, आता त्रिशाकर मधु हिने व्हायरल झालेला व्हिडिओ डिलीट करण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भातील एक संतप्त पोस्ट सुद्धा तिने सोशल मिडीयावर शेअर केली आहे.
“देव सगळं बघतो आहे. मला खाली आणण्यासाठी माझा प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. तुमच्या बहिणीशी कोणी लग्न करून दुसऱ्या दिवशी त्यांच्या सुहागरातचा व्हिडीओ व्हायरल केला तर चांगल वाटेल ना. बिहारमध्ये वाईट लोक आहेत याची कल्पना मला नव्हती…’ या आशयाची पोस्ट त्रिशाकर मधू हिने केली आहे.