अमरावती – पोलीस उपनिरीक्षक असलेल्या अधिकाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना 14 ऑगस्ट रोजी घडली होती. अनिल मुळे असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. मुळे यांनी आत्महत्या केल्यानंतर एक ऑडिओ क्लीप समोर आली आहे. त्यामध्ये वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे.
मुळे हे अमरावतील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरिक्षक पदावर कार्यरत होते. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली होती. मुळे यांनी दोन दिवसांपुर्वी आत्महत्या केली होती. त्यानंतर आज त्यांची एक ऑडिओ क्लीप समोर आली आहे.
आत्महत्या करण्यापुर्वी मुळे हे हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आपल्या मित्राला फोनवर बोतल होते. माझी काही चुकी नसताना मला वरिष्ठांकडून त्रास दिला जात आहे. मला दोन वेळा आपल्या वरिष्ठांनी शिक्षा केली आहे. मी पोलीस कमिश्नर आरती सिंह यांना सुद्धा भेटलो, तरी सुद्धा त्यांनी माझं ऐकून घेतलं नाही. तर माझी बदली झाली, प्रमोशन होऊन सुद्धा माझं इन्क्रीमेंट रोखलं. माझी पीआय हजर करुन घेत नाही आहे, सीपी ऑफिसला जा म्हणते, तर सीपी ऑफिस पीआयकडे जा, असे म्हणत आहे.
दरम्यान, या ऑडिओ क्लीपवरु त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे यामधून दिसून येत आहे. या प्रकरणाचा तपास नांदगाव पेठ पोलीस करत आहेत.