सासवड-जेजुरी रोडवर अपघात सत्र चालूच

सासवड: सासवड जेजुरी पालखी महामार्गावर खळद रासकर मळा अरुंद पुलावर एस टी बस कठड्याला धडकून सात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. राजापूर आगाराची एसटी बस पंढरपूर कडून स्वारगेटच्या दिशेला जात असताना रासकर मळा येथील फुलावर ती समोरून येणाऱ्या बसणे दाबल्यामुळे चालकाचा बस वरील ताबा सुटून बस पुलाच्या कठड्याला जाऊन धडकली.

यामध्ये चालक वाहक आणि 39 प्रवासी प्रवास करत होते. यातील सात प्रवाशांना सासवड येथील शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी पाठवले असून इतर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. महामार्गावरील अर्धवट व अपुऱ्या कामामुळे रोज एक अपघात होत आहे. पुलाचे अर्धवट काम तसेच लोखंडी सळईचे बार पुलातून बाहेर आले आहेत त्याचा मोठा दोखा असून ते बार एस टी बस मध्ये घुसले व बस कठड्याला जाऊन अडकली या वेळी स्थानिक नागरिकांनी प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली.

धोंडीबा धुमाळ व्यंकट धोंडीबा धुमाळ वय 60 राहणार बाळुपाटलाचीवाडी बाळासाहेब महादेव पवार वय 70 राहणार वाल्हा,शोभा मवहादेव साठे वय 55 राहणार निरा, महादेव भिकाजी साठे वय66 राहणार नीरा, हनुमंत नागा रेड्डी वय 23 मंगळवेढा, प्रभाकर आनंदराव साळुंखे वय 75 राहणार वढु खुर्द ,डॉ शांताराम कुदळे वय 45 राहणार कोळविहिरे अशी जखमींची नावे आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)