दुचाकीवरून 3 लाख 86 हजाराच्या गांजाची वाहतुक करणारे दोघे जेरबंद

पुणे – दुचाकीवरून विक्रीसाठी गांजा घेऊन जाणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने जरबंद केले. त्यांच्याकडून 3 लाख 86 हजार 250 रुपये किंमतीचा 25 किलो 170 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

सुमित भाऊसाहेब बर्वे (वय 23, रा. बोरी एंदी, ता. दौंड आणि पंकज अभिमन्यू रणवरे (वय 20, रा. बाणेर) अशी त्या दोघांची नावे आहेत. गुरूवारी (दि. 18) रोजी खंडणी विरोधी पथककाचे प्रभारी पोलीस निरीक्षक गजानन पवार कर्मचाऱ्यासह हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस कर्मचारी प्रदीप शिंदे आणि एकनाथ कंधारे त्यांना खबऱ्यांकडून माहिती मिळाली की, मांजरी भागातून दोन व्यक्ती दुचाकीवरून एका पोत्यात भरून गांजा गिऱ्हाईकाला द्यायला निघाले आहेत.

त्यानंतर निरीक्षक पवार, उपनिरीक्षक निखिल पवार आणि आनंद रावडे यांनी सापळा रचून मांजरी, घुले वस्ती येथील सार्वजनिक रस्त्यावर कारवाई केली. गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक गजानन पवार, उपनिरीक्षक आनंद रावडे, निखिल पवार, कर्मचारी प्रदीप शिंदे, एकनाथ कंधारे, संतोष मते, अविनाश मराठे, शिवानंद बोले, महेश कदम, विजय गुरव आणि फिरोज बागवान यांनी ही कारवाई केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)