ख्रिस्तीना कोच यांना पाहताच कुत्र्याला झाला आनंद अनावर
वॉशिंग्टन : 41 वर्षीय आंतराळवीर ख्रिस्तीना कोच आज त्यांच्या घरी वर्षभराने परतल्या. त्यांचा एलबीडी नावाचा कुत्रा त्यांचू आतुरतेने वाट पहात होता. त्याला झालेल्या आनंदाचा व्हिडिओ त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी लिहलं आहे, नक्की उमगेना झालंय? कोणाला जास्त आनंद झालाय. सुमारे 25 लाख जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. नासाने त्यावर दिलेली दाद म्हणजे दुधात साखर आहे.
Not sure who was more excited. Glad she remembers me after a year! pic.twitter.com/sScVXHMHJn
— Christina H Koch (@Astro_Christina) February 13, 2020
या व्हिडिओत हा कुत्रा आपली शेपूट हालवत दाराच्या आत पाय वर करून दार उघडण्याची आणि कोच येण्याची वाट पहात उभा आहे. त्यांनी दार उघडताच आणि कोच घरात येताच तो त्यांच्या भोवती शेपूट हालवत नाचत आहे. त्यानंतर त्यांनी त्याची पापी घेताच तो आपल्या मालकिणीचे गाल चाटू लागतो, असे चित्रण या व्हिडीओत आहे.
नेटीझन्सनी या व्हिडीओला दाद दिली आहे. ही त्यांना मिळालेली सर्वात सुंदर भेट आहे. कुत्रा ही सर्वात सुंदर भेट आपल्यापैकी अनेकांना मिळाली नाही. आपण येथे नसताना त्याची रिऍक्शन दाखवणारा एखादा व्हिडिओ आहे का? अशी विचारणारी प्रतिक्रिया अनेक नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यात तो आपल्या गालाला चाटत असल्याचा सीन तर फारच रोमांचक आहे, असेही म्हणत हा व्हिडिओ रिट्विट केला आहे.