धर्मशाळा – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना धर्मशाळा येथे होणार होता, पण सतत पडणाऱ्या पावसामुळे अखेर पहिला सामना एकही चेंडू न खेळता रद्द करण्यात आला आहे. आता, मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना रविवारी (15 मार्च) होणार आहे.
The 1st ODI between India and South Africa has been abandoned due to rains.#INDvSA pic.twitter.com/Oc5iO6q9dj
— BCCI (@BCCI) March 12, 2020
धर्मशाळा येथे दुपारी 1.30 वाजता सामना सुरू होणार होता. पण, त्यापूर्वी पाऊस झाल्याने बीसीआयने ट्विटरव्दारे सामना सुरू होण्याच्या अर्धातास आधी पावसामुळे नाणेफेकीस उशीर होणार असून 1.15 वाजता खेळपट्टीचे निरिक्षण होणार असल्याचे सांगतिले होते.
The cut-off time for a 20-over match is 6:30pm IST#INDvSA pic.twitter.com/4pPKJsmRBW
— BCCI (@BCCI) March 12, 2020
पण, त्यानंतर पुन्हा दोनच्या सुमारास पाऊस पडण्यास सुरूवात झाली. तीनच्या सुमारास बीसीसीआयने 6.30 च्या आधी पाऊस थांबला आणि पोषक वातवरण निर्माण झाले तर प्रत्येकी 20-20 षटकांचा सामना खेळता येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली होती. पण पावसाचा जोर कायम राहिल्यांन अखेर 5.30 च्या सुमारास पंचानी मैदानाची स्थिती पाहता हा सामना रद्द झाल्याची घोषणा केली.