नवी दिल्ली : कोरोना विषाणूने भारतात पाय पसरायला सुरवात केली आहे. कोरोना व्हायरसमुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील शाळा, कॉलेज, कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद राहतील असे म्हंटले आहे.
CoronaVirus declared as an epidemic in Delhi !
All cinema halls,schools,colleges(whose examinations have been held)in Delhi to be closed till 31st March.
CM @ArvindKejriwal announced it after meeting with LG Anil Baijal. pic.twitter.com/klex7MqMVp
— Aam Aadmi Party Delhi (@AAPDelhi) March 12, 2020
भारतात आतापर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे 73 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील शाळा, कॉलेकम कार्यालये, चित्रपटगृह 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी दिल्ली सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. कोरोनाचा रुग्ण आढळल्यास त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली. रुग्णांसाठी विलीगीकरण कक्ष सज्ज असून रुग्णालयात पुरेश्या खाटा उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं.
नागरिकांनी कोरोना विषाणूपासून काळजी घ्यावी. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. तसेच अनावश्यक प्रवास टाळावा असे आवाहन त्यांनी केले.