“तो’ तरुण अद्यापही बेपत्ताच

दोन किलोमीटरपर्यंत शोधकार्य सुरू

संकेत असवलेला श्रद्धांजली

वडगाव मावळ – महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षाचा प्रवेश परत जाणाऱ्या विद्यार्थ्याची मोटार टाकवे बुद्रुक येथील इंद्रायणी नदीच्या पुलावरून नदीपात्रात पडून मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याला शुक्रवारी (दि.2) श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला वाणिज्य व बीबीए महाविद्यालय विद्यार्थी, शिक्षक व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली.

टाकवे बुद्रुक –  इंद्रायणी नदीवरील पुलावरून कठडे तोडून नदी पात्रातील वाहत्या पाण्यात मोटार पडली. एक जण पाण्यातून बाहेर आला, तर दुसरा मोटारीसोबत मृतावस्थेत आढळला. तिसरा बेपत्ता झाला असून, त्या तरुणाचे दुसऱ्या दिवशीही शोधकार्य सुरू होते.

कारमधून अक्षय संजय ढगे (वय 20), संकेत नंदु असवले (वय 20) आणि अक्षय मनोहर जगताप (वय 20, तिघेही रा. टाकवे बुद्रुक, ता. मावळ) हे तिघेजण गुरुवारी (दि. 1) दुपारी एकच्या सुमारास कान्हे फाट्याकडून टाकवे गावाकडे जात होते. यावेळी त्यांची मोटार नदीवरील पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात पडली. अक्षय ढगे हा तरुण पोहून बाहेर आला. मात्र त्याचे दोन मित्र मोटारीमध्येच अडकून राहिले. रात्री उशिरा संकेत असवलेचा मृतदेह गाडीसोबत आढळून आला. मात्र अजूनही अक्षय जगताप बेपत्ता आहे.

शोधकार्यात अडचण येत असल्याने रात्री उशिरा अक्षय जगतापचा शोध थांबविण्यात आला. शुक्रवारी (दि. 2) दुपारी साडेबाराच्या सुमारास शोधकार्य पुन्हा सुरू झाले आहे. मावळचे नायब तहसीलदार चाटे यांच्यासह पोलीस बंदोबस्तात हे शोधकार्य सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत अक्षय जगताप याचे शोधकार्य सुरू होते. मात्र, आजही अपयश आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.