मुंबई – गेल्या काही काळापासून सतत वादाच्या भोवऱ्यात राहणारी बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री ‘कंगना रणावत’ सोशलवर चांगलीच सक्रिय असते. सध्या मात्र ही ‘पंगा गर्ल’चर्चेत आहे ती तिच्या सुपर हॉट फोटोंमुळे.
होय, कंगनाने नुकतंच इन्स्टाग्रामवर स्वत:चे काही सुपर ग्लॅमर अँड हॉट फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले असून, या फोटोंवर कमेंट अँड लाईक्स चा पाऊस पडत आहे. तर काही चाहत्यांकडून तिला ट्रोल केले जात आहे.
एका यूजर्सने कंगनाला या लूक वरून चांगलेच ट्रोल केले आहे. “तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती कंगना, इतके वाहयात कपडे यार, असे एका युजरने लिहिले. तर, एकाने ‘ओह… संस्कार आणि संस्कृतीवर तूच भाषण देतेस ना?’ असे अन्य सवाल केलं आहेत.
View this post on Instagram
त्या ट्रोलिंगवर कंगनाने आता सडेतोड उत्तर दिले आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन तिने एक स्टोरी पोस्ट केली आहे. यात तिने एका प्राचीन काळाताल एका भारतीय महिलेचे चित्र पोस्ट केले आहे. त्यात तिने लिहिले की, “जे लोक मला सनातन धर्माबद्दल ज्ञान देत आहेत त्यांनी कृपया लक्षात घ्या तुम्ही अब्राहमिक सारखं वागत आहात.
View this post on Instagram
दरम्यान, शेअर केलेल्या या फोटोंमध्ये कंगना कोर्सेट ब्रालेट आणि पँटमध्ये दिसतेय. या लूक मध्ये ती अतिशय मादक अँड ग्लॅमर्स दिसत आहे. कंगनाच्या या मादक अदांनी फॅन्स अक्षरशः हा घायाळ झाले आहेत.
View this post on Instagram
कंगनाने फक्त हे फोटो शेअर केले नाहीत तर गालिबचा एक ‘शेर’ही शेअर केला. “मोहब्बत में नहीं फर्क जीने और मरने का, उसी को देख कर जीते हैं जिस काफिर पे दम निकले…’ असा हा शेर आहे.