आशिष कुमारसह 8 भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी

थायलंड ओपन मुष्टियुद्ध स्पर्धा

बॅंकॉक – थायलंड ओपन मुष्टियुद्ध स्पर्धेत शनिवारी भारताच्या आशिष कुमारने 75 किलो गटात सुवर्णपदक पटकावले. असून या स्पर्धेत भारताने एक सुवर्ण, चार रौप्य व तीन कांस्यपदकांसह आठ पदके पटकावली. आशिषचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक आहे.

भारताच्या माजी ज्यु. चॅम्पियन निकहत झरीन (51), दीपक (49), मोहम्मद हसमुद्दीन (56) व बृजेश यादव यांनी रौप्यपदक पटकावले. तर, इंडिया ओपनमध्ये रौप्यपदक पटकावल्यानंतर आशिषने शनिवारी कोरियाच्या किम जिनजाए याच्यावर 5-0 अशी एकतर्फी मात केली. निकहतला चीनच्या चांगने 5-0 असे पराभूत केले.

56 किलो गटात मोहम्मद हसमुद्दीन याला थायलंडच्या चाचाई देचा बुतदी याच्याकडून पराभूत व्हावे लागले, तर उजबेकिस्तानच्या मिर्जाखमेदोव नोदिरजोन याने दीपकला 49 किलो वजनगटात पराभूत केले. 81 किलो वजन गटात बृजेश यादवने आपली सर्व ताकद पणाला लावली; मात्र त्याला थायलंडच्या अनावत थोंगक्रातोक याने 4-1 असे पराभूत केले. यापूर्वी भारताच्या मंजू राणी (48)ला थायलंडच्या चुटामाट रकसतने पराभूत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)