पृथु गुप्ताच्या रुपाने भारताला मिळाला 64 वा ग्रॅंड मास्टर

नवी दिल्ली – भारताचा महान बुद्धिबळपट्टू विश्‍वनाथन आनंदने 1987 मध्ये बुद्धिबळ स्पर्धेतील ग्रॅंड मास्टर किताब पटकवल्यानंतर तब्बल 32 वर्षानंतर दिल्लीच्या पृथु गुप्ताने देशातील 64 वा ग्रॅंड मास्टर होण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे.

दहावीच्या इयत्तेत शिकणाऱ्या पृथुने पोर्तुगालमधील प्रथम डिव्हिजन लीगच्या पाचव्या राउंडमध्ये जर्मनीच्या आंतरराष्ट्रीय मास्टर ले यांकेलेविचला 2500 एलो रेटिंगने (एखाद्या खेळाडूची क्षमता ठरवणारे बुद्धिबळातले परिमाण) पराभूत करत हा किताब आपल्या नावे केला. भविष्यात विश्‍व चॅम्पियन होण्याची क्षमता पृथुमध्ये आहे.

दिल्लीत आयोजित स्वागत समारंभामध्ये पृथु म्हणाला की, मला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. माझ्याकडून ज्या अपेक्षा केल्या जातात त्या पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. 2600 एलो रेटिंगचा टप्पा पार करण्याचे लक्ष्य आहे. विश्‍वनाथन आनंद 1987 मध्ये भारताचा पहिला ग्रॅंड मास्टर ठरला होता. त्यानंतर 32 वर्षानंतर पृथु देशातील 64 वा ग्रॅंड मास्टर आहे. यापूर्वी 2018 मध्ये पृथुने आंतरराष्ट्रीय मास्टर किताब पटकवला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.