सोलापूर – राज्यात रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. असे असताना सोलापूर मधून अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. कार आणि दोन ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाला असून या अपघातात 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी 6 च्या सुमारास सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर हा अपघात झाला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच वळसंग पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून क्रेनच्या साह्याने कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आले आहे. व उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
सचिन सुरेंद्र खटके (वय-25), सपना सचिन खटके (वय-25), परमेश्वर शिवाजी सोनटक्के (वय-40), पल्लवी गिरिष तिवारी (वय-28), व 3 लहान मुले सर्व रा .उस्मानाबाद; तसेच ट्रक चालक गणेशन असे अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.