तिसरी आयकॉन ग्रुप लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज स्पर्धा
पुणे – जय शहा, तनिश शेठ, रोहन बजाज या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून येथे होत असलेल्या पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित 8 व 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील तिसऱ्या आयकॉन ग्रुप लिटिल कुमार टेनिस चॅम्पियनशिप सिरिज 2019 स्पर्धेत आगेकूच केली.
सेंटर फॉर पोलिस रिसर्च(सीपीआर), पाषाण येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत 10 वर्षाखालील मुलांच्या गटात जय शहा याने रिशान शहावर टायब्रेकमध्ये 5-4(7-0) असा संघर्षपूर्ण पराभव केला. तनिश शेठने विहान सावंतचा 5-2 असा तर, रोहन बजाजने आरव मुळ्येचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. मुलींच्या गटात शिबानी गुप्ते, अस्मि टिळेकर, अमीशी गर्ग, आदिती सागवेकर, निहारिका घोषाल यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल :
10 वर्षाखालील मुले : पहिली फेरी : तनिश रोकडे वि.वि. मिहीर काळे 5-1, तनिश शेठ वि.वि. विहान सावंत 5-2, रोहन बजाज वि.वि. आरव मुळ्ये 5-0, जय शहा वि.वि. रिशान शहा 5-4 (7-0).
10 वर्षाखालील मुली : शिबानी गुप्ते वि.वि. श्रुष्टि सूर्यवंशी 5-2, अस्मि टिळेकर वि.वि. आर्या श्रीमाळी 5-0, अमीशी गर्ग वि.वि. सान्वी जोशी 5-3, सिद्धी मिश्रा वि.वि. साईशा शिंदे 5-0, आदिती सागवेकर वि.वि. ईरा निकलजे 5-1, रेया तेलंग वि.वि.काव्या तुपे 5-2, निहारिका घोषाल वि.वि. ऐश्वर्या गोपीकृष्णन 5-0.